Santosh Deshmukh । आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर अमानुष मारहाण करताना व्हिडिओ आणि फोटो काढले होते. हे व्हिडिओ व्हायरल झाले असून यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याने त्याच्या व्हॉट्सॲपवर व्हिडिओ शेअर केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. (Santosh Deshmukh murder case)
याप्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. दररोज याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत असून आताही एक माहिती समोर आली आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी आणि इतर कामे मिळण्यासाठी पवनचक्की प्रकल्पाचे व्यस्थापक सुनील शिंदे (Sunil Shinde) यांचे घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी दोनदा अपहरण केले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे देशमुख यांचे अपहरण ज्या डोणगाव येथील टोलनाक्यावरून केले होते त्याच टोलनाक्यावरून 28 मे 2024 ला सुनील शिंदे यांचे अपहरण सुदर्शन घुलेने आपल्या साथीदारांसह केले होते, अशी माहिती आता उघडकीस आली आहे.
सुनील शिंदे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांचे अपहरण टोलनाक्यावरून करून अगोदर धारूर, नंतर खरवंडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे नेले. पाथर्डी पोलिसांची नाकाबंदी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन फौजदार संजय तुपे यांच्या पथकाने त्यांची सुटका झाली.
Santosh Deshmukh appeals to killers
तसेच संतोष देशमुख यांनी मारेकऱ्यांना हत्येपूर्वी जीवे न मारण्यासाठी विनंती केली होती. माझे हातपाय तोडा पण मला माझ्या गावासाठी आणि मुलांसाठी सोडा अशी विनंती ते मारेकऱ्यांना करत होते, तरीही मारेकऱ्यांना त्यांना मारले.
महत्त्वाच्या बातम्या :