Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला उद्या तीन महिने पूर्ण होतील. अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा फरारच आहे. या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
अशातच आता पुन्हा एकदा हा हत्येप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख मारेकऱ्यांना जीवे न मारण्यासाठी विनंती करत होते. माझे हातपाय तोडा पण मला माझ्या मुलांसाठी आणि गावासाठी जगू द्या, अशी विनंती देशमुख करत होते.
पण या मारेकऱ्यांना थोडीही त्यांची दया आली नाही. तब्बल तीन तास ते संतोष देशमुख यांना मारहाण करत राहिले, अशी माहिती संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने (Vaibhavi Deshmukh) दिली आहे. यामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष देशमुख यांना अपहरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2024 ला चाटेचा धमकावणारा फोन आला होता. त्यानंतर देशमुखांनी वैभवीला माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे, असेही सांगितलं होते.
Dhananjay Munde resigns from ministerial post
दरम्यान, नुकतेच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यभरातून आरोपींविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या :