IPL 2025 | भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jaspirt Bumrah ) काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला ब्रेक घ्यावा लागला. आता सर्वांच्या नजरा आयपीएल 2025 मध्ये त्याच्या पुनरागमनाकडे लागल्या आहेत, पण त्याच्या फिटनेसबाबत समोर आलेली नवी माहिती मुंबई इंडियन्ससाठी ( Mumbai Indians ) चिंतेची बाब ठरू शकते.
बुमराह IPL 2025 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तो सध्या बेंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रियेत आहे. वैद्यकीय अहवालानुसार, तो एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच मैदानात उतरू शकतो, त्यामुळे मुंबई इंडियन्सला त्याच्याशिवाय काही सामने खेळावे लागू शकतात.
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, बुमराहच्या पुनर्वसनात सकारात्मक प्रगती दिसून येत आहे आणि त्याने सराव गोलंदाजीला सुरुवात केली आहे. मात्र, तो पूर्ण वेगाने गोलंदाजी करण्यासाठी अजून तयार नाही, त्यामुळे त्याच्या वर्कलोडवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्याच्या परतीसाठी एप्रिलचा पहिला आठवडा योग्य मानला जात आहे, आणि जोपर्यंत तो 100% फिट होत नाही, तोपर्यंत त्याला खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Jasprit Bumrah miss first two weeks of IPL 2025
जर बुमराह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संघात परतला, तर तो मुंबई इंडियन्सचे किमान 3-4 सामने गमावू शकतो. लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव हाही हंगामाच्या सुरुवातीला खेळू शकणार नाही. रिपोर्टनुसार, मयंक यादवही एप्रिल महिन्यात आयपीएलमध्ये ( IPL 2025 ) सहभागी होण्याची शक्यता आहे.
बुमराहची अनुपस्थिती मुंबई इंडियन्ससाठी ( Mumbai Indians ) मोठी समस्या ठरू शकते, कारण संघाच्या गोलंदाजीची मदार मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर असते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुंबईला त्याच्या अनुभवाची उणीव जाणवेल. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहे, आणि चाहतेही बुमराहला ( Jaspirt Bumrah ) लवकरात लवकर मैदानावर पाहण्यास आतुर आहेत.
महत्वाच्या बातम्या