Dhananjay Munde । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर येताच अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अशातच आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सतत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत असतात. धस यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने कृषी खात्यात 200 कोटी रुपयांचा घोटाळा (Scam in the agriculture department) झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आता धस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
सुरेश धस कृषी विभागातील घोटाळ्याबाबत थेट ईडीकडे (ED) पत्र लिहून तक्रार करणार आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आणखी दबाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. तसेच ईडी धनंजय मुंडेंची चौकशी करणार का? असा सवाल देखील राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
जर ईडीने धनंजय मुंडे यांची कृषी विभागातील कथित घोटाळ्याची चौकशी केली तर मुंडेंच्या पुन्हा अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसांपासून विविध कारणांवरून अडचणीत असलेले मुंडे पुन्हा अडचणीत येतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Suresh Dhas file complaint against Dhananjay Munde
तसेच सुरेश धस यांनी कृषी विभागातील कथित घोटाळ्याची ईडीकडे केलेल्या तक्रारींवर धनंजय मुंडे त्यांना काय उत्तर देतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इतकेच नाही तर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि सुरेश धस असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :