Share

रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत? Gulabrao Patil यांचा सवाल

by MHD
Gulabrao Patil criticize Rohini Khadse

Gulabrao Patil । जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याकडे महिलांना एक खून माफ करण्याची मागणी केली आहे. यावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसे यांचा समाचार घेतला आहे. “महिलेने, तरुणीने त्यांच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवावा, असे बाळासाहेब ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. यावरून त्यांच्यावर खूप टीका झाली होती. पण आज स्व संरक्षणाकरता महिला आणि तरुणींनी अशा पद्धतीने वागण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.

“रोहिणी खडसे काय म्हणाल्या मला त्याबाबत माहिती नाही. पण त्या कोणाचा खून करीत आहेत, त्याचं नाव त्यांनी सांगावे. महिलांनी बिथरूण न जाता संकटाशी संघर्ष करण्याचे मानसिकता ठेवली पाहिजे,” असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला.

“आज जरी महिला सक्षमीकरणाच्या आपण गोष्टी करत असलो तरी राज्यात कित्येक घाण घटना घडत आहेत. ज्यांना मुली आहेत ते खूप भाग्यशाली आहेत कारण वडिलांची जर कोणी काळजी घेत असेल तर ती मुलगी आहे,” असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Gulabrao Patil on Rohini Khadse

ते पुढे म्हणाले की, “महिलांच्या तरुणींच्या आत्महत्याच्या संख्यांमध्ये वाढ झाली आहे. तीच ढाल, तीच तलवार, तीच जबाबदारी आता तुला घ्यायची आहे. शेळी नको, मला आता तुझ्यात वाघीण बघायची आहे, अशा पद्धतीचे चित्र आता महिलांमध्ये निर्माण झाले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :

Rohini Khadse had demanded that women be forgiven for one murder. Gulabrao Patil has criticized her for this.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now