Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी अनेक महत्त्वाची माहिती देखील उघडकीस येत आहे.
अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी वापरलेली हत्यारांची रेखाचित्रे समोर आली आहे. हे सर्व फोटो सीआयडीने (CID) आरोपपत्रात जोडले आहेत. हे फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराडने आवादा पवनचक्की प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्याकडे तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. महत्त्वाचे म्हणजे ही खंडणी परळी येथील जगमित्र कार्यालयामध्ये बसून मागितली असल्याची माहिती समोर आली आहे.
सुनील शिंदे यांना एकदा जगमित्र कार्यालयात बोलवले होते. काम सुरळीत ठेवायचे असेल तर, खंडणीची मागणी पूर्ण करा नाहीतर काम बंद करा अशी धमकीदेखील सुनील शिंदे यांना देण्यात आली होती.
Santosh Deshmukh murder case Information that will increase Dhananjay Munde problems
दरम्यान, न्यायालयात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोषारोपपत्र सीआयडीकडून सादर करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रातून दररोज विविध माहिती समोर येत आहे. अशातच आता आमदार धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) अडचणीत वाढ करणारी माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :