Share

धक्कादायक! Satish Bhosale उर्फ खोक्या भाईने मारहाण केलेल्या बाप-लेकावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Satish Bhosale and his associates had severely beaten up Dilip Dhakne and his son Mahesh Dhakne. The police have now registered a case against them.

by MHD

Published On: 

Case registered against Dilip Dhakane, Mahesh Dhakane who were beaten up by Satish Bhosale

🕒 1 min read

Satish Bhosale । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा सतीश भोसले उर्फ खोक्या भाईमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. कारण या जिल्ह्यातील शिरूर गावात सतीश भोसलेच्या दहशतीचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.

सतीश भोसले हा आपल्या सहकाऱ्यांसह आठ दिवसांपूर्वी दिलीप ढाकणे (Dilip Dhakne) यांच्या शेतामध्ये हरणांची शिकार करण्यासाठी गेला होता. यावेळी ढाकणे यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी दिलीप ढाकणे, त्यांचा मुलगा महेश ढाकणे (Mahesh Dhakne) यांना खूप मारहाण केली.

मारहाणीनंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. पण एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावले असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशातच आता आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील हे करत आहेत.

Case registered against Dilip Dhakane, Mahesh Dhakane

ढाकणे पिता-पुत्राला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेच्या अटकेची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. अशातच आता पोलिसांनी ढाकणे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!