Chhagan Bhujbal । विधानसभेत विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. पण आज ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट विधानसभेमध्ये उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.
कांदा उत्पादकांना योग्य दर मिळत नसल्याने भुजबळ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. “एकनाथ शिंदे कांदा प्रश्नी (Onion Issue) उपाय काढण्यासाठी दिल्लीत केंद्र सरकारशी चर्चा करा,” असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.
“कांद्याचा खर्च १५०० रुपये, त्यावर ५० टक्के नफा, २२५० आधारभूत किंमत ठेवावी असे राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगू शकते का? कांद्याच्या दरावर ३००० रुपयांपर्यंत कोणताही निर्बंध लावला जाऊ नये. जरी ३ हजाराचे ४ हजार झाले तरी एमएपी लागू करण्यात यावी,” अशी मागणी भुजबळ यांनी केली.
“जर ४ ते ५ हजार रुपये भाव गेल्यास निर्यात कर आणि भाव ६ हजारांच्या वर गेल्यास निर्यात बंदी करा,” असे भुजबळ म्हणाले. यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “भाव कमी असताना साठवून ठेवायचे आणि भाव आला की उचलायचे. मी स्वत: केंद्र सरकारकडे जाऊन हा मुद्दा उपस्थित करून कायमचा प्रश्न निकालात काढू,” असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
Chhagan Bhujbal vs Eknath Shinde On Onion Issue
“मुख्यमंत्री असताना निर्यात बंदी उठवण्यासाठी पियूष गोयल यांना पत्र दिले होते. अमित शहा यांना याबाबत माहिती दिली होती. कांदा नाशवंत पीक असून ते टिकावे म्हणून ज्युरॅडिशन केंद्र असायला हवे असे समितीने सुचवले आहे,” असेही शिंदेनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :