Uddhav Thackeray । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
“मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी. या अर्थसंकल्पावरून (Maharashtra Budget 2025) आज मला अत्रे यांची आठवण झाली आहे. आज जर ते असते तर बोलले असते, एवढ्या दहा वर्षात बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता,” असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.
“सार काढायच झाले तर उद्या सूर्य उगवणार आहे. त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल असा हा राज्याचा अर्थसंकल्प आहे. बहुमत मिळालेले हे सरकार असून दहा थापा होत्या ते आज यांनी केल्या का?,” असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला आहे.
पुढे ते म्हणाले की, “या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी यांनी केली का? अजूनही शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आजच्या अर्थसंकल्पमध्ये सामान्य माणसासाठी काहीच नाही. पण कॉन्ट्रॅक्टरसाठी खूप काही आहे,” असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2025
दरम्यान, अजित पवारांनी आज विधानसभेत मांडलेल्या या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे. या टीकेवर अजित पवार आणि महायुती सरकार उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :