IPL 2025 । चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (Champions Trophy) आता आयपीएलचा (IPL) थरार रंगणार आहे. अवघ्या काही दिवसांवर आयपीएल येऊन ठेपली आहे. अशातच आता एका स्टार खेळाडूने आयपीएलमधून माघार घेतली आहे. याचा त्याला फटका बसू शकतो.
इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू हॅरी ब्रूक (Harry Brook) आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. याबाबत हॅरी ब्रूक यानेच सोशल मीडियावर माहिती दिली आहे. सलग दुसऱ्यांदा त्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्या या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे.
2023 मध्येही त्याने आयपीएलमधून माघार घेतली होती. आता त्याला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. बीसीसीआयच्या नियमांनुसार, हॅरी ब्रूकच्या या निर्णयामुळे त्याला पुढील दोन हंगामांसाठी IPL मधून बंदी घालण्यात येईल.
“इंग्लंड क्रिकेटसाठी हा खूप महत्त्वाचा काळ आहे. मला आगामी मालिकांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण तयारी करायची आहे. गेल्या काही महिन्यांत माझा क्रिकेट प्रवास अत्यंत व्यस्त होता, त्यामुळे मला आता थोडा वेळ हवा आहे,” अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर केली आहे. त्यामुळे आता हॅरी ब्रूकच्या जागी दिल्ली कॅपिटल्स कोणत्या खेळाडूला संघात स्थान देणार? याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
Delhi Capitals Full Schedule in IPL 2025
24 मार्च : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
30 मार्च : दिल्ली कैपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
5 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
10 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी
13 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
16 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
19 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
22 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
27 एप्रिल : दिल्ली कैपिटल्स विरुद्ध आरसीबी
29 एप्रिल : दिल्ली कैपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
5 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
8 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स
11 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
15 मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
Delhi Capitals team for IPL 2025
अक्षर पटेल, कुलदीप यादव, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, मिशेल स्टार्क, जेक फ्रेजर-मैकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, त्रिपुराना विजय, माधव तिवारी, मोहित शर्मा, फाफ डुप्लेसी, मुकेश कुमार, दर्शन नालकांडे, वी. निगम, दुष्मंथा चमीरा, डोनोवन फरेरा, अजय मंडल, मनवंत कुमार.
महत्त्वाच्या बातम्या :