Lucknow Super Giants । 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलपूर्वी (IPL 2025) लखनऊ सुपर जायंट्सला मोठा झटका बसला आहे. कारण संघाचा एक युवा वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाही.
मागील वर्षी मयंक यादव (Mayank Yadav) ऑक्टोबरमध्ये बांगलादेश विरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पणानंतर जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. मयंक यादव आयपीएल 2025 च्या पहिल्या सहामाहीतून बाहेर पडेल, म्हणजे तो सुमारे 7 सामने खेळू शकणार नाही.
बीसीसीआयकडून (BCCI) मयंक यादवच्या पुनरागमनाची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही. जर त्याने तंदुरुस्तीचे निकष पूर्ण केले आणि त्याचा कामाचा ताण वाढवला, तर तो आयपीएल 2025 च्या दुसऱ्या भागात खेळू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सने त्याला लिलावापूर्वी 11 कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. गेल्या हंगामात लखनऊने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. यंदा त्याच्या आयपीएलच्या पगारात चांगली वाढ केली आहे.
Lucknow Super Giants IPL 2025 Full Schedule
24 मार्च – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 मार्च – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
1 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
4 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
6 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
12 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
14 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
19 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
22 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 एप्रिल – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
4 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
9 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
14 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
18 मे – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
Lucknow Super Giants Squad 2025
ऋषभ पंत, डेविड मिलर, एडेन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंह, मैथ्यू ब्रीट्जके, निकोलस पूरन, मिच मार्श, राजवर्धन हंगरगेकर, अरगोन कुलकर्णी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, आयुष बडोनी, आवेश खान, आकाश दीप, आकाश सिंह, शमर जोसेफ, प्रिंस यादव, मोहित खान, एम सिद्धार्थ, रवि बिश्नोई, दिग्वेश सिंह.
महत्त्वाच्या बातम्या :