Share

‘त्यांना’ मारहाण का केली? Satish Bhosale म्हणाला, “मी सामाजिक कार्यकर्ता..”

Satish Bhosale, who was not caught by the police, has responded to the allegations against him. This time, he has denied all of them.

by MHD

Published On: 

Satish Bhosale first reaction on viral video

Satish Bhosale । मागील काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे (Khokya Bhai) नाव चांगलेच चर्चेत आहे. दररोज त्याचे नवनवीन कारनामे समोर येत आहे. पोलिसांकडून सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांच्या हाती न लागलेल्या सतीश भोसलेने आपल्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. “आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का? मित्राच्या कार्यक्रमात मी पैसे उधळले तो आनंदाचा क्षण होता. मी कष्टाने कमावलेला पैसा होता,” असे सतीश भोसले म्हणाला.

“दिलीप ढाकणे हा माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची छेड काढत होता. त्याच्याकडे माऊली खेडकरच्या बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ होता. तो व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी तो देत होता. म्हणून मी त्याला मारहाण केली,” असे सतीश भोसले याने स्पष्टीकरण दिले.

“आपण गुंड नाही तर सामाजिक कार्यकर्ता आहे. अंजली दमानियांना (Anjali Damania) चुकीची माहिती दिली गेली. गुंड कशाला म्हणतात? माझे सामाजिक कार्यक्रमातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहा. मी हातपाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर त्या शाळा-कॉलेजमधील मुलींची छेड काढण्याचे प्रकार बंद झाले आहेत,” असा दावा भोसलेने केला आहे.

Satish Bhosale car seized by police in Shirur

दरम्यान, सतीश भोसले पुराव्यासह लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतीच सतीश भोसलेची आलिशान कार पोलिसांकडून शिरूर परिसरातून जप्त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही