Satish Bhosale । विविध गुन्ह्यामध्ये पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा (Khokya Bhai) शोध घेत आहेत. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सतीश भोसलेने नुकतेच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याच्या अटकपूर्व जामीनावर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सतीश भोसले लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापूर्वी त्याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मंजूर होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
आज दुपारी बीड जिल्हा सत्र न्यायालयात या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्याचे वकील शशिकांत सावंत (Shashikant Sawant) यांनी एक युक्तिवाद केला आहे. “शिरुर पोलीस ठाण्यामध्ये ढाकणे यांच्याकडून जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो एफआयआर पहा. त्यात सतीश भोसले मुख्य आरोपी नाही,” असा दावा सावंत यांनी केला.
“या एफआयआरमध्ये चौथ्या क्रमाकांचा आरोपी आहे. ढाकणे कुटुंबावर अॅट्रॉसिटी आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. राजकीय दबावामुळे दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे,” असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
Shashikant Sawant on Satish Bhosale viral video
पुढे ते म्हणाले की, “जर सतीश भोसलेने दिलीप ढाकणे (Dilip Dhakane) यांना मारहाण केली असती तर ते आपल्या बापाला गाडीतून खाली उतरवून ढाकणेंना दवाखान्यात घेऊन गेले असते का?,” असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या :