Share

मारेकऱ्यांना मदत करणारे येणार अडचणीत? Dhananjay Deshmukh यांचा गौप्यस्फोट

Dhananjay Deshmukh has revealed that another case is likely to be registered in the Santosh Deshmukh murder case.

by MHD

Published On: 

Dhananjay Deshmukh said that another FIR will be filed in Santosh Deshmukh murder case

🕒 1 min read

Dhananjay Deshmukh । मस्साजोग या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) उद्या पहिली सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यावर आता संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुखांनी माहिती दिली आहे.

“संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फरार होण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे आणि ज्यांनी आरोपींना लपवले, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेल्यांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे,” अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि आमदार संदिप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या कार्यकर्त्यांचे व्हायरल व्हिडिओप्रकरणी धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. “न्यायासाठी लढणाऱ्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न होतोय. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत, त्यांना शिक्षा होणार आहे,” अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.

“आम्हाला उद्यापर्यंत चार्जशीटची कॉपी मिळेल. पोलिसांकडून एक एफआयआर दाखल होणार असून तो कशा प्रकारचा आहे, हे लवकरच समजेल. ज्यांना हे प्रकरण मागे पडले असे वाटत आहे त्यांना या प्रकरणात न्याय मिळण्याची भूमिका नाही,” असे देशमुख म्हणाले.

Dhananjay Deshmukh target Balaji Tandale

पुढे ते म्हणाले की, “बालाजी तांदळे 60 – 70 गाड्या घेऊन फिरत असल्याची माहिती आहे. त्याला हे काम कोणी सांगितले होते? खालच्या लोकांना पकडून मुख्य सूत्रधार, मुख्य सूत्रधाराचा मुख्य माणसांना बाहेर काढायचे असा प्लॅन होता,” असा आरोप देखील देशमुख यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)