Suresh Dhas । मागील काही महिन्यांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. विरोधक सातत्याने त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांचा राजीनामा मागत होते. अखेर धनंजय मुंडेंनी देशमुखांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिली.
तरीही सातत्याने विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत. अशातच आज धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडेंनी (Ajay Munde) पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी आपली भूमिका मांडली. “आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचे काम सुरु आहे. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप केले जात आहेत,” असा दावा अजय मुंडेंनी केला आहे.
“मुंडे कुटुंबीय धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहोत. कुटुंबातील एकही सदस्य त्यांच्यावर नाराज नाही. धनंजय मुंडेंच्या घराचे काम सुरु असल्याने आई गावच्या घरी आहे. कारण नसताना धनंजय मुंडे यांना बदनाम केले जात आहे,” असा आरोप अजय मुंडे यांनी केला आहे.
“संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना न्याय द्यायचा आहे, म्हणून आम्ही शांत आहे. खोक्यासोबत सुरेश धस यांनाही सहआरोपी करा. ते किती धुतल्या तांदळाचे आहेत, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. परळीची नाहक बदनामी होताना पाहून आम्हाला वाईट वाटत आहे,” असेही अजय मुंडे म्हणाले.
Ajay Munde on Suresh Dhas
“सुरेश धस आरोप करून पळून जातात, पुरावे द्या. संतोष देशमुख प्रकरणातील जे आरोपी आहेत, त्यांना कडक शासन झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमच्या कुटुंबावर धस यांनी आरोप केले, म्हणून आम्ही पुढे येऊन बोलत आहोत,” असे अजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :