Prakash Solanke । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार, मंत्री अडचणीत येताना पाहायला मिळत आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे टेन्शन वाढले असल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता अजित पवार गटाचे आणखी एक आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीसंदर्भात एक मोठे वक्तव्य केले आहे. “मी फक्त 10 ते 12 कोटी रुपये खर्च करून विधानसभा निवडणूक जिंकली आहे,” असे वक्तव्य प्रकाश सोळंके यांनी केले आहे. यामुळे विरोधक त्यांच्यावर निशाणा साधू शकतात.
“कुणीही पैशाच्या जोरावर निवडणुकीला उभे राहत असल्याची परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळाली. माजलगाव विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने निवडणुकीमध्ये 45 कोटी रुपये खर्च केले आहेत,” असे आपण ऐकलं असल्याचे सोळंके म्हणाले.
“राजकारणामध्ये सर्वसामान्यांची काम करणे महत्त्वाचे असून पैसे दुय्यम आहेत. मी आपले फक्त दहा ते बारा कोटी रुपये खर्च केले आहेत आणि निवडणूक जिंकली आहे,” असा दावा सोळंके यांनी केला आहे.
Prakash Solanke on Assembly Elections
सोळंके यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याच वक्तव्यावरून विरोधक सोळंके आणि अजित पवार गटाला पुन्हा एकदा घेरू शकतात. सोळंके यांच्या वक्तव्यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले