Share

मोठी बातमी! पाप धुवायला गेला अन् पोलिसांनी आवळल्या Satish Bhosale च्या मुसक्या

by MHD
Satish Bhosale Arrest from Prayagraj

Satish Bhosale । मागील काही दिवसांपासून सतीश भोसलेने केलेले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल (Satish Bhosale Viral Video) झाले होते. यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अखेर आज पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात मोठे यश आले आहे.

पोलिसांनी दोन पथके नेमून त्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक (Satish Bhosale Arrest) केली आहे. मागील आठवड्यापासून पोलिसांना गुंगारा देत असणाऱ्या सतीश भोसलेला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला उद्यापर्यंत बीडमध्ये आणण्यात येईल.

त्याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सतीश भोसले पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु होती. तसेच तो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार होता.

परंतु, त्यापूर्वी प्रयागराज पोलिसांनी सतीश भोसले याला अटक केली आहे. याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (Navneet Kanwat) यांनी माहिती दिली आहे. मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत.

Satish Bhosale Arrest in Prayagraj

दरम्यान, सतीश भोसले याच्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर विरोधक निशाणा साधत आहेत. अशातच आता सतीश भोसले याला बीड पोलिसांकडे स्वाधीन केल्यानंतर त्याची पोलीस कसून चौकशी करू शकतात. चौकशीदरम्यान, आणखी कोणते खुलासे होतील? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

The local crime branch team has succeeded in arresting Satish Bhosale, who has been evading police since last week.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now