Sooryavansham । ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला सूर्यवंशम चित्रपट आजही घराघरात पाहिला जातो. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले होते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत होते.
सौंदर्याने (Soundarya) अनेक हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु, वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी 17 एप्रिल 2004 रोजी भारतीय जनता पक्ष आणि तेलुगू देसम पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी करीमनगरला जाताना तिच्या खाजगी विमानाचा अपघात झाला.
या अपघातात तिचा मृत्यू (Soundarya Death) झाला. आता या घटनेला 22 वर्षे होऊन गेली असून याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी टॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोहन बाबू (Mohan Babu) यांच्याविरोधात एक FIR दाखल झाला आहे.
मोहन बाबू आणि सौंदर्या या दोघांमध्ये संपत्तीवरुन वाद होता अशी माहिती समोर आली आहे. फिर्यादीकडून मोहन बाबूवर विमान अपघातानंतर भाऊ आणि बहिणीवर जमिनीची विक्री करण्यासाठी दबाव आणि बेकायदेशीरपणे संपत्तीवर ताबा मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Sooryavansham Fame Actress Soundarya Death Update
तब्बल 22 वर्षांनी सूर्यवंशम फेम अभिनेत्रीच्या निधनावरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सौंदर्याची हत्या झाली होती की नाही? असा सवाल आता चाहत्यांमधून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी मोहन बाबू अडचणीत येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :