Vijay Wadettiwar । आज सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईला पोलिसांनी प्रयागराजमधून मुसक्या आवळल्या आहेत. लवकरच त्याला बीडमध्ये आणण्यात येणार आहे. यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“खोक्याला अटक झाली हे बरं झाले. खोके म्हटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत? तेही समजावे. इकडे जसा आकांचा आका शोधला आहे तसा खोक्याचा बोका शोधावा,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
“हे खोके कुठून येतात? त्यांच्याकडे सोन्याचा खजाना कोठून येतो? त्याला कोणाचा आशीर्वाद आहे? हे पोलिसांनी सगळं शोधून काढावे. पोलीस दिसले की आधी चड्डी पिवळी व्हायची. आता काय परिस्थिती आहे?”, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “आता पोलिसांचा धाक कमी झाला आहे. त्यांची लढण्याची क्षमता कमी झाली आहे. पोलिसांवर राजकीय हस्तक्षेप आणि दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता धाक दरारा असलेला पोलीस असायला पाहिजे,” असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला.
Vijay Wadettiwar reaction on Satish Bhosale Arrest
“जर पोलिसांची अवहेलना करायला लागले तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकू शकते? पोलिसांना अगोदर कायद्याने काम करण्याची परवानगी होती. गृहमंत्र्यांनी यावर लक्ष द्या,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यामुळे आता वडेट्टीवार यांची मागणी सरकार मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :