Share

“संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख..”; Pankaja Munde यांनी घेतला धसांचा समाचार

by MHD
Pankaja Munde criticizes Suresh Dhas

Pankaja Munde । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh murder case) बीडमधील अंतर्गत राजकारण बदलले असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सातत्याने मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका करत आहेत.

यावर आज पंकजा मुंडेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “मी भाजपची राष्ट्रीय नेता आहे. तरीही सुरेश धस थेट आरोप कसे करतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी धस यांना समज द्यावी,” अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

“सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची भेट गपचूप का घेतली? गेली तीन वर्षे राज्यात महायुतीचे सरकार असून तेव्हा धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि धस आमदार होते. त्यावेळी वाल्मिक कराड काम करत होता. त्याच्या विषयीची एकही तक्रार धस यांनी या सरकारकडे का केली नाही? असा सवाल देखील मुंडेंनी उपस्थित केला.

“लोकसभेला जे माझं लीड होतं, ते अर्ध्यापेक्षा कमी झाले. मग त्यांनी माझे काम केले नाही असं म्हणायच का? जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आला आहे, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं,” असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

Pankaja Munde On Santosh Deshmukh Murder Case

“मस्साजोगला देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी 12 डिसेंबर रोजी निघाले होते तेव्हा निम्म्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुख म्हणाले की, आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या. आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचे वर्तन केले, तर ते आम्हाला पटणार नसल्याने मी मागे फिरले,” असा खुलासा मुंडे यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या :

Suresh Dhas has been constantly criticizing Pankaja Munde. Finally, today Pankaja Munde has given him a befitting reply.

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD