Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आज याप्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली. याप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याचे लोक मला मारुन टाकतील, असे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांनी हत्येच्या आदल्या दिवशी अश्विनी देशमुख यांना सांगितले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अश्विनी देशमुख (Ashwini Deshmukh) यांनी महत्त्वाचा जबाब दिला.
“विष्णू चाटे याचा फोन संतोष देशमुख यांना आला होता. चाटे देशमुखांना म्हणाला की, तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला हे खूप जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी विष्णू चाटे याने दिली असल्याची माहिती अश्विनी देशमुख यांनी दिली.
“विष्णू चाटेचा फोन आल्यानंतर संतोष देशमुख यांना खूप टेन्शन आले होते. मी त्यांना धीर देत समजावण्याचा प्रयत्न केला होता. काळजी करू नका. याप्रकरणी तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या,” अशी विनंती अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुखांकडे केली.
Santosh Deshmukh wife Statement to CID
त्यावर संतोष देशमुख हे अश्विनी देशमुख यांना म्हणाले होते की, “तुला माहिती नाही, वाल्मिक कराड हा गुंड असून त्याची राजकीय नेत्यासोबत फिरत असतो. तो आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील.” दरम्यान, अश्विनी देशमुखांनी दिलेल्या जबाबामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :