Pune Rape Case । पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या बलात्काराच्या (Pune Bus Rape Case) घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटताना दिसून येत आहे. अशातच आता आरोपीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय गाडे (Dattatraya Gade) गुन्हा करून बसने सकाळी ११ वाजता त्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावी आला. घरी आल्यावर त्याने शर्ट बदलला. संध्याकाळी पाच वाजता गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार झाला. तोपर्यंत तो त्याच्याच गावात फिरत होता.
त्याचे शेवटचे लोकेशन शिरुर आहे, असे मोबाईलवरुन दिसून आले. पोलिसांची एकूण १३ पथके त्याचा शोध घेत आहेत. त्याला पकडून देणाऱ्याला बक्षीस देखील दिले जाणार आहे. दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांनी दिली.
त्यानंतर पोलिसांकडून ड्रोनद्वारे ऊस शेतामध्ये त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या भावाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
Yogesh Kadam gave clean chit to police
पत्रकार परिषद घेत योगेश कदम यांच्याकडून या प्रकरणामध्ये पोलिसांना क्लीनचिट देण्यात आली आहे. तसेच डेपो मॅनेजर आणि एसटी महामंडळाने लावलेल्या खासगी सेक्युरिटीवर या प्रकरणाचे खापर फोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :