Pune Rape Case । पुणे शहरातील स्वारगेट शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे (Swargate Rape Case) संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांची एकूण 13 पथके आरोपी दत्ता गाडे यांच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत. (Pune Swargate Bus case)
आज गृहराज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. “याप्रकरणी पुणे पोलिसांनी दुर्लक्ष केले किंवा निष्काळजीपणा झाला असे म्हणता येणार नाही. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा रात्री 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत पोलिसांनी किती वेळा गस्त घातली होती? याची माहिती घेतली आहे, असे योगेश कदम म्हणाले आहेत.
“सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं असल्याने पोलिसांनी दुर्लक्ष केले नाही. बस स्टँडच्या आवारात जी खासगी सुरक्षा होती. जर या यंत्रणेने नीट काम केले असते तर ही घटना घडली नसती,” असा दावा कदम यांनी केला.
“पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आरोपीची ओळख पटवून त्याला ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. आरोपी पळून जाऊ नये म्हणून गुप्तता पाळण्यात आली,” असेही योगेश कदम म्हणाले.
Yogesh Kadam on Pune Rape Case
दरम्यान, योगेश कदम यांच्याकडून या प्रकरणामध्ये पोलिसांना क्लीनचिट देण्यात आली आहे. तसेच डेपो मॅनेजर आणि एसटी महामंडळाने लावलेल्या खासगी सेक्युरिटीवर या प्रकरणाचे खापर फोडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :