लखनऊच्या तोंडचा घास पळवणारा Ashutosh Sharma आहे तरी कोण? जाणून घ्या

by MHD
Who is Ashutosh Sharma make DC register their historic win

Ashutosh Sharma | काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) दणदणीत विजय झाला. लखनऊने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर विजयासाठी तब्बल २१० धावांचे टार्गेट ठेवले होते.

पण १० षटकांच्या आतच दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला होता. त्यामुळे विजय लखनऊचाच होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. असे असूनही दिल्लीच्या विप्रज निगम आणि आशुतोष शर्मा दोघांनी लखनऊवर एका विकेटने विजय विजय मिळवला.

आशुतोष शर्माच्या धडाकेबाज कामगिरीने लखनऊला हार मानावी लागली. इतकेच नाही तर आशुतोष शर्मा याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवलं. मागील वर्षी आशुतोष शर्मा पंजाब किंग्सच्या संघात होता. त्यावेळी गुजरात जायंट्सविरूद्ध शशांक सिंगच्या मदतीने चांगली खेळी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते.

आशुतोष शर्माबद्दल अधिक सांगायचे झाले तर त्याचा जन्म १५ सप्टेंबर १९९८ ला रतलाम मध्यप्रदेशमध्ये झाला. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट खेळायला आवडत असायचे. तो फलंदाज आणि गोलंदाजीमध्येही निपुण आहे.

तो मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपली कामगिरी दाखवून दिली. त्याचे लहानपणीचे क्रिकेट कोच भूपेन चौहान यांनी कठिण काळात चांगली साथ दिली.

Who is Ashutosh Sharma?

२०२३ मध्ये त्याने रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. भारताचा माजी विकेटकिपर फलंदाज नमन ओझाने देखील त्याला मोठा पाठिंबा दिला. आशुतोषला लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ३.८० कोटींना विकत घेतले आहे. पाहिल्याच सामन्यात त्याने ३१ बॉलमध्ये नाबाद ६६ धावांची आक्रमक खेळी केली असून यात ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.

आज आयपीएलचा पाचवा सामना गुजरात जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडणार आहे. शुबमन गिल गुजरातचं तर पंजाब किंग्सचं श्रेयस अय्यर नेतृत्व करणार आहे. विजयासाठी दोन्ही संघात रस्सीखेच पाहायला मिळेल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.

Gujarat Titans Squad For IPL 2025

जोस बटलर (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, इशांत शर्मा, जयंत यादव, महिपाल लोमरोर, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, जेराल्ड कोएत्झी, शेरफेन रदरफोर्ड, मानव सुथार, कुमार कुशाग्रा, अर्शद खान, गुरनूर ब्रार आणि निशांत सिंधू.

Punjab Kings Squad For IPL 2025

जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.

महत्त्वाच्या बातम्या :

Lucknow were defeated by Ashutosh Sharma explosive performance. Not only that, Ashutosh Sharma was also named Man of the Match.

Sports Cricket IPL 2025 Marathi News