Suresh Dhas । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर (Santosh Deshmukh murder case) भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु, धस यांनी अचानक मुंडेंची गुप्तभेट घेतल्याची माहिती समोर आली. याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहे.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी निशाणा साधला आहे. “सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठी घडवून आणलेली घटना आहे. कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुरेश धस यांना सूचना दिली होती,” असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
“त्याच्या पलीकडे जाऊन पाहिले तर आका, बंदूक, रेती, टिप्पर, असे शब्द रांगड्या भाषेत मांडले जात होते. परंतु, आता हे शब्द मागे पडले आहेत. आता मांडवली, मांडवली आणि मांडवली या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येत आहे,” असा चिमटा हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीवरून काढला.
Harshvardhan Sapkal on Suresh Dhas and Dhananjay Munde meeting
दरम्यान, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून मस्साजोगचे नागरिक संतप्त झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच ही भेट घडवून आणल्याचा आरोप केला आहे. यावरून धस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“चंद्रशेखर बावनकुळे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी मला जेवायला बोलावले होते. त्यांनी जेवायला बोलावल्यावर तिथे जाणे माझे काम आहे. कारण ते माझे बॉस आहेत. मी तिथे गेल्यावर काही वेळानंतर त्या ठिकाणी धनंजय मुंडे आले आणि आमच्यात अर्धा-पाऊण तास चर्चा झाली,” असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या :