Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या (Santosh Deshmukh murder case) करण्यात आली. यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे.
तरीही संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक केली असून कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याला दोन वेळा फरार घोषित करूनही तो सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कोर्टाकडून कृष्णा आंधळेची संपत्ती (Krishna Andhale property) जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडी अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केला होता. अखेर या अर्जावर बीड कोर्टाकडून आज आदेश देण्यात आला आहे.
कृष्णा आंधळे याच्या नावावर 5 वाहने आहेत. धारुर आणि केजमध्ये बँक खाते आहे. आता त्याची ही सर्व जप्त करण्यात येणार आहे. हा कृष्णा आंधळेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या कारवाईनंतर फरार कृष्णा आंधळे पोलिसांना शरण येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
Krishna Andhale property will be confiscated
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास पोलीस, एसआयटी आणि सीआयडी करत आहे. सातत्याने या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर केले जात आहेत. तसेच वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावरदेखील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आरोप केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :