Dhananjay Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) पोलिसांना सापडला नाही. पोलिसांनी त्याला दोन वेळा फरार घोषित केले आहे, तरीही तो पोलिसांना गुंगारा देत आहे.
अशातच आता बीड कोर्टाकडून कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त (Krishna Andhale property) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडी अधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केला होता. अखेर या अर्जावर बीड कोर्टाने परवानगी दिली आहे.
“संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु आहे. जर कृष्णा आंधळे नाही सापडला तर त्याने किती गुन्हे केलेत? त्याची पार्श्वभूमी समजणार नाही. या सगळ्या प्रश्नावर यंत्रणेला घेराव घातल्याशिवाय लोक राहणार नाहीत. तो फरार असताना त्याने पोलीस यंत्रणेसोबत हातमिळवणी केली होती,” असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
“कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागला तर महत्त्वाचे पुरावे हाती येणार आहेत. तो एक गंभीर गुन्हेगार आहे, फरार असून त्याचे मित्र व्हाट्सअपला, इन्स्टॉल स्टेटस ठेवून दहशत निर्माण करण्याची डेअरिंग करतात. त्याची पण मोठी गँग असेल,” असा दावा धनंजय देशमुख यांनी केला.
Dhananjay Deshmukh on Krishna Andhale
“कृष्णा आंधळेला ज्याने पोसल होते, त्याचे त्याला अभय आहे. कृष्णा आंधळेची संपत्ती तर जप्त करावीच पण त्याला अटक करावी आणि त्याला फाशी द्यावी,” अशी मोठी मागणी धनंजय देशमुख यांना माध्यमांशी बोलताना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :