Mumbai Indians । चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) नंतर आयपीएलच्या 18 व्या हंगामाचा (IPL 2025) थरार सुरु होणार आहे. आगामी आयपीएलला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत, चाहत्यांना आतापासूनच आयपीएलची उत्सुकता लागली आहे.
मुंबई इंडियन्सने IPL 2025 च्या लिलावात फिरकीपटू अल्लाह गझनफरला (Allah Ghazanfar) करारबद्ध करत 4.8 कोटींमध्ये संघात सामील केले होते. पण अल्ला गझनफरने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल 2025 मधून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले होते.
पण मुंबई इंडियन्सने 23 वर्षीय फिरकीपटू मुजीब उर रहमानला (Mujeeb Ur Rahman) संघात करारबद्ध केले आहे. मुजीब उर रहमानबद्दल सांगायचे झाले तर त्याने वयाच्या 16 व्या वर्षी अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने 2018 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले
आयपीएल खेळणारा तो सर्वात युवा खेळाडू असून विशेष म्हणजे त्याने 2021मध्ये त्याने सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाचे प्रतिनिधत्व देखील केले आहे. मुजीबने आतापर्यंत एकूण 300 (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय) सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 6.5 च्या एकोनॉमीने एकूण 330 विकेट मिळवल्या आहेत.
Mumbai Indians Squad For IPL 2025
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, दीपक चाहर, विल जॅक्स, मुजीब उर रहमान, मिचेल सँटेनर, रायन रिकल्टन, लिझाड विल्यम्स, रिस टोप्ली, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॉन जेकॉब्स, वेंकट सत्यनारायण पेन्मेत्सा, राज अंगद बावा, श्रीजिथ कृष्णा, अश्विनी कुमार.
महत्त्वाच्या बातम्या :