Anjali Damania । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणीत भर पडली आहे. सत्ताधारी आणि विरोधक देखील सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आता उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनीच ठरवावे, असे वक्तव्य केले आहे.
अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा कोंडीत सापडले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील सतत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत. मुंडेंविरोधात दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पुरावे दिले आहेत.
तरीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. अशातच आता अजित पवार यांच्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या भूमिकेवरून अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्यावर अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
Anjali Damania on Ajit Pawar
“सिंचन घोटाळ्यावेळी मी जे काही आरोप केले, त्यावेळी चाैकशी लागली होती. आता मुळात म्हणजे चाैकशी लागली नाही. धनंजय मुंडे खोटे बोलत आहेत. अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जे काही बोलत आहेत, ते अतिशय धक्कादायक आहे. तुम्ही सरकार, पक्ष बंद करा. हवे त्या गुंड लोकांना घेऊन त्यांना हवी ती दहशत करू द्या. मी ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना भेटते, त्यावेळी ते म्हणतात त्या पक्षातील लोक निर्णय घेतील,” असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :