Share

मुंडे-धस भेटीवरून Devendra Fadnavis यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

by MHD
CM Devendra Fadnavis first reaction on Dhananjay Munde, Suresh Dhas meeting

Devendra Fadnavis । भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“कोण कुणाला भेटले याच्यावर जर अशा पद्धतीचा राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणांमध्ये गंभीर भूमिका घेतली आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

“सुरेश धस हे देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणी गंभीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा असे करणे बरोबर नाही. धनंजय मुंडे हे सुद्धा राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे एखादा आमदार, एखाद्या मंत्र्याला भेटला तर काही फरक पडत नाही,” असे म्हणत सुरेश धस यांची फडणवीसांनी पाठराखण केली आहे.

Devendra Fadnavis on Dhananjay Munde and Suresh Dhas meeting

दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांपासून धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीवरून मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह विरोधकांनी धस यांना टार्गेट केले आहे. परंतु, या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी धस यांना पाठीशी घातले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

For the past three to four days, the political atmosphere has heated up due to the meeting between Dhananjay Munde and Suresh Dhas. Similarly, now Devendra Fadnavis has reacted in this matter.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now