Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरणात भाजपचा हात? Sanjay Raut यांचा मोठा सवाल

by MHD
Sanjay Raut targets BJP over Santosh Deshmukh murder case

Sanjay Raut । संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Santosh Deshmukh murder case) राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

“चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा की नाही? यापेक्षा कोणी घ्यायचा आहे ठरवावे. तो अजित पवार (Ajit Pawar) यांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा? मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपने सुरेश धस (Suresh Dhas) हा मोहरा पुढे आणला त्यासाठी त्यांनी संतोष देशमुख खुनाचा वापर केला,” असा आरोप राऊत यांनी केला.

“संतोष देशमुख हत्याप्रकरणात भाजपचा हात आहे का? लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावे लागणार आहे. संतोष देशमुख हत्येप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) याच्याबाबत का नाही लढाई केली?”, असाही संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Raut targets BJP

पुढे राऊत म्हणाले की, “आकाचा आका हे शब्द आम्ही आणले नाहीत, ते भाजपने आणले. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगावे की सुरेश धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांना त्यावेळीच थांबवायला हवं होते. त्यावेळी त्यांना बोंबाबोंब करायला दिली,” असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.

“बीडमध्ये वातावरण निर्मिती करून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला. बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे? हे सुरेश धस यांनी संपूर्ण राज्याला आणि देशाला सांगावे,” असेही संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

Sanjay Raut has once again targeted the BJP while the politics of the state has heated up due to the Santosh Deshmukh murder case.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now