Share

IPL Schedule 2025 जाहीर! पहिल्या सामन्यात ‘हे’ संघ येणार आमनेसामने, जाणून घ्या

by MHD
IPL Schedule 2025 announced

IPL Schedule 2025 । इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएल (IPL) ही जगातील सर्वात मोठी टी २० लीग आहे. चाहते दरवर्षी या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. बीसीसीआयकडून (BCCI) या सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

आयपीएलची (IPL 2025) सुरुवात २२ मार्च पासून होणार असून या स्पर्धेचा अंतिम सामना हा २५ मे रोजी होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना केकेआर विरुद्ध आरसीबीमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनवर स्टेडियमवर पार पडणार आहे. आयपीएलमध्ये यंदा एकूण ७४ सामने १३ वेगवेगळ्या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.

आयपीएलचे सामने लखनौ, मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, अहमदाबाद, न्यू चंदीगड, हैदराबाद, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाला या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यावेळी एकूण १२ डबल हेडर सामने असणार आहेत. म्हणजेच प्रत्येकी दोन सामने दिवसातून 12 वेळा खेळवण्यात येणार आहेत.

आता Viacom18 आणि Star India यांचे विलीनीकरण झाले आहे. आता जिओचे जियो हॉटस्टार (Jio Hotstar) हे नवीन अॅप आले आहे. पण येथे चाहत्यांना IPL सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार नाही. जर चाहत्यांना सामने पाहायचे असतील तर पैसे खर्च करावे लागतील.

जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल तर सबस्क्रिप्शन पॅकची सुरूवात १४९ रूपयांपासून सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ऍड फ्री व्हर्जनसाठी तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी ४९९ रुपये प्रेक्षकांना मोजावे लागू शकतात.

प्रत्येक वर्षी आयपीएलचा पहिला सामना मागील हंगामात फायनल खेळणाऱ्या दोन संघांमध्ये व्हायचा, पण यंदा तो होताना दिसत नाही. मागील हंगामाच्या म्हणजेच IPL 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना झाला होता. परंतु यावेळी पहिला सामना KKR आणि RCB यांच्यात पार पडणार आहे.

Indian Premier League Schedule 2025

  • २२ मार्च (शनिवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
    ईडन गार्डन्स, कोलकाता. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २३ मार्च (रविवार) – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद. वेळ- दुपारी ३:३०
    चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
    एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २४ मार्च (सोमवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
    डॉ. वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २५ मार्च (मंगळवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज
    नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २६ मार्च (बुधवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
    बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २७ मार्च (गुरुवार) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २८ मार्च (शुक्रवार) – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
    एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २९ मार्च (शनिवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
    नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ३० मार्च (रविवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
    डॉ. वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
    वेळ – दुपारी ३:३०
    राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
    बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ३१ मार्च (सोमवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
    वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १ एप्रिल (मंगळवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज
    भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २ एप्रिल (बुधवार) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स
    एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ३ एप्रिल (गुरुवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
    ईडन गार्डन्स, कोलकाता. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ४ एप्रिल (शुक्रवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
    भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ५ एप्रिल (शनिवार) – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
    एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. वेळ – दुपारी ३:३०
    पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
    महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ६ एप्रिल (रविवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
    ईडन गार्डन्स, कोलकाता. वेळ – दुपारी ३:३०
    सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ७ एप्रिल (सोमवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
    वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ८ एप्रिल (मंगळवार) – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
    महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ९ एप्रिल (बुधवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
    नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १० एप्रिल (गुरुवार) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
    एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ११ एप्रिल (शुक्रवार) – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
    एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १२ एप्रिल (शनिवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
    भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
    वेळ – दुपारी ३:३०
    सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १३ एप्रिल (रविवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
    सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर. वेळ – दुपारी ३:३०
    दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
    अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १४ एप्रिल (सोमवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
    भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १५ एप्रिल (मंगळवार) – पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
    महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १६ एप्रिल (बुधवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
    अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १७ एप्रिल (गुरुवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
    वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १८ एप्रिल (शुक्रवार) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज
    एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १९ एप्रिल (शनिवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
    नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. वेळ – दुपारी ३:३०
    राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
    सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २० एप्रिल (रविवार) – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
    महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड
    वेळ – दुपारी ३:३०
    मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
    वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २१ एप्रिल (सोमवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स
    ईडन गार्डन्स, कोलकाता. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २२ एप्रिल (मंगळवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
    भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २३ एप्रिल (बुधवार) – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २४ एप्रिल (गुरुवार) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
    एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २५ एप्रिल (शुक्रवार) – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
    एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २६ एप्रिल (शनिवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज
    ईडन गार्डन्स, कोलकाता. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २७ एप्रिल (रविवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
    वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ – दुपारी ३:३०
    दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
    अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २८ एप्रिल (सोमवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
    सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २९ एप्रिल (मंगळवार) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
    अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ३० एप्रिल (बुधवार) – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
    एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १ मे (गुरुवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
    सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २ मे (शुक्रवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
    नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ०३ मे (शनिवार) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
    एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ४ मे (रविवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
    ईडन गार्डन्स, कोलकाता. वेळ – दुपारी ३:३०
    पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
    हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ५ मे (सोमवार) – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ०६ मे (मंगळवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
    वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ७ मे (बुधवार) – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
    ईडन गार्डन्स, कोलकाता. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ८ मे (गुरुवार) – पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
    हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ९ मे (शुक्रवार) – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
    भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १० मे (शनिवार) – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • ११ मे (रविवार) – पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
    हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाळा. वेळ – दुपारी ३:३०
    दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
    अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १२ मे (सोमवार) – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
    एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १३ मे (मंगळवार) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
    एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १४ मे (बुधवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
    नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १५ मे (गुरुवार) – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
    वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १६ मे (शुक्रवार) – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
    सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १७ मे (शनिवार) – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
    एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू. वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • १८ मे (रविवार) – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
    नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद. वेळ – दुपारी ३:३०
    लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
    भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २० मे (मंगळवार) – टीबीसी विरुद्ध टीबीसी, क्वालिफायर १
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २१ मे (बुधवार) – टीबीसी विरुद्ध टीबीसी, एलिमिनेटर
    राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २३ मे (शुक्रवार) – टीबीसी विरुद्ध टीबीसी, क्वालिफायर २
    ईडन गार्डन्स, कोलकाता
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता
  • २५ मे (रविवार) – टीबीसी विरुद्ध टीबीसी, अंतिम सामना
    ईडन गार्डन्स, कोलकाता
    वेळ – संध्याकाळी ७:३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या : 

BCCI has announced the official IPL Schedule 2025 for the 18th season. Which team will play this match on the first day? find out

Marathi News Cricket IPL 2025 Sports

Join WhatsApp

Join Now