IPL 2025 । आयपीएलचे (IPL) सामने 22 मार्चपासून सुरु होणार आहेत. आयपीएल 2025 चं वेळापत्रक (IPL 2025 Schedule) जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने येणार आहेत.
आयपीएल सामन्यांच्या वेळापत्रकानंतर क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या संघाच्या सामन्यांची तिकिटे (IPL Ticket ) खरेदी करण्यास खूप उत्सुक आहेत. बऱ्याचदा चाहत्यांना अनेक सामान्यांचे तिकीट सुद्धा मिळत नाहीत. अशातच तिकीट बुकिंग प्रक्रिया चाहत्यांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. (IPL Ticket Booking)
क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाने अद्याप बुकिंगविषयी कोणतीही विशिष्ट माहिती दिली नाही. परंतु, तुम्ही तिकीट फ्रँचायझी वेबसाइटद्वारे आणि ऑफलाइन सामन्यांची स्टेडियमवर खरेदी करू शकता. आयपीएल सामन्याचे तिकीट BookMyShow, Paytm आणि Zomato Insider वर विकत घेता येईल.
यंदा आयपीएल सामन्यांच्या तिकिटांची विक्री फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य तिकिटांचे दर जाणून घ्यायचे झाले तर सामान्य तिकिट अंदाजे 800 रुपये ते 1,500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर प्रीमियम तिकिट 2,000 रुपये ते 5,000 रुपये तसेच व्हीआयपी आणि एक्झिक्युटिव्ह बॉक्स 6,000 रुपये 20,000 रुपये आणि कॉर्पोरेट बॉक्स 25,000 रुपये ते 50,000 रुपये आहे.
IPL 2025 Ticket Booking
तिकिट बुक करण्यासाठी, तुम्ही अधिकृत आयपीएल तिकीट वेबसाइट किंवा तुमच्या आवडत्या संघाच्या साइटला भेट द्या. त्या ठिकाणी तुमचे खाते तयार करा किंवा लॉग इन करा. सामना निवडून पसंतीची आसन श्रेणी निवडा. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करून ईमेल किंवा एसएमएसद्वारे तुमचे बुकिंग तपशील मिळवा.
महत्त्वाच्या बातम्या :