Manoj Jarange । संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) आक्रमक भूमिका बजावणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अचानक मंत्री धनंजय मुंडेंची (Dhananjay Munde) भेट घेतली आणि ते विरोधकांच्या निशाण्यावर आले. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
“मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे महत्त्व कमी करण्यासाठी सुरेश धस यांचा वापर झाला. धस हे चांगले वक्ते असून एका जनसमुदायाला ते खेळवून ठेवू शकतात. लोकांना मोहीत करण्याची कला त्यांना अवगत आहेत. ती कला मनोज जरांगे यांच्याकडे नाही,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Jitendra Awhad on Suresh Dhas
“जर तुम्ही धनंजय मुंडेंना शत्रू मानत होतात आणि त्याच शत्रूसोबत तुम्ही तब्बल साडेचार तास चर्चा करता. यातच तुमच्या युद्धातली सगळी दाहकता, तीव्रता संपते. या भेटीची बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांनीच फोडली. त्यावेळी त्यांच्यात टू द पॉईंट चर्चा झाली असावी,” असा दावाही आव्हाड यांनी केला आहे.
तसेच आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवर भाष्य केले. “अजित पवार (Ajit Pawar) जे बोलतात ते अगदी सत्य आहे. ज्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. अनेकांनी त्यांना सांगितलं होते तुम्ही राजीनामा देऊ नका. महाराष्ट्राची परंपरा आहे, ज्यावेळी मोठे आरोप होतात, चौकशी लागते त्यावेळी ती व्यक्ती सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडते. सत्तेच्या सोबत राहिलेल्या त्या माणसाला पोलिसांचा अभय मिळते,” असा आरोप आव्हाड यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :