Dhananjay Deshmukh । भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अचानक मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी घडवून आणली आहे, असा आरोप होत आहे.
याप्रकरणी आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बुथप्रमुख हा कोणत्याही पक्षाचा पाया असतो. 10 वर्षांपासून संतोष अण्णा देशमुख हे भाजपचे बुथप्रमुख म्हणून काम करत होते. पण त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना भेटण्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांना राजकीय नेत्यांच्या भेटी घडवून आणणं महत्त्वाचं वाटलं,” असा आरोप देशमुख यांनी केला आहे.
“आमच्या कुटुंबियांना भेटण्यापेक्षा बावनकुळे ते दुसऱ्यांच्याच भेटी घडवून आणण्यात व्यस्त होते, याचा आम्हाला खेद वाटतो. जर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला, तर आम्ही कुटुंब टोकाचे पाऊल उचलू. याला सरकार जबाबदार राहील,” असा इशाराही धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
Dhananjay Deshmukh on Chandrasekhar Bawankule
“आम्हाला आणि आमच्या गावाला राजकारणात रस नाही. आम्ही फक्त न्याय मागण्याच्या भूमिकेत आहोत. ज्यांनी आरोपींना पोसलं, ज्यांनी आरोपींना राजाश्रय दिला, त्यांची चौकशी झाली पाहिजे. आरोपीला फरार करणारे, त्यांना सांभाळणारे. यांना धडा शिकवला पाहिजे. अपहरण करणाऱ्यांना, खंडणी मागणाऱ्यांना कसा धडा शिकवला जातो, याचे उदाहरण सेट करणे गरजेचे आहे,” असे वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या :