Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) अडीच महिने होऊन गेले आहेत. पोलीस यंत्रणा आणि प्रशासन आरोपींना रान मोकळं करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच कालपासून मस्साजोगच्या नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा. PI महाजन आणि API राजेश पाटील यांना बडतर्फ करा, सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करा. 25 तारखेपर्यंत आम्ही गावकऱ्यांनी त्यांना मुदत दिली आहे, या मागण्या मस्साजोगच्या नागरिकांनी काल बैठकीत केल्या. जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर 25 तारखेला अन्न त्याग आंदोलन करू इशारा मस्साजोगच्या नागरिकांनी दिला.
तसेच कृष्णा आंधळे (Krishna Andhale) अजून फरार असून सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याचा मोबाईलही पोलिसांना हस्तगत करता आला नाही. त्यामुळे मस्साजोग नागरिकांनी तपास यंत्रणावर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज बीड दौऱ्यावर आहेत.
Supriya Sule meet Santosh Deshmukh and Mahadev Munde family
यावेळी त्या संतोष देशमुख आणि परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. “कोणाच्याही कुटुंबियांवर अन्याय झाला तर न्यायाच्या भूमिकेत आलं पाहिजे. सुप्रिया सुळे यांच्याकडून आम्हाला केवळ न्यायाची अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :