Share

संतोष देशमुखांसाठी Supriya Sule यांनी घेतली आक्रमक भूमिका, म्हणाल्या; “पैशांची आणि सत्तेची मस्ती…”

Supriya Sule is on a tour of Beed district today. At this time, he consoled the Deshmukh family and targeted the government.

by MHD

Published On: 

Supriya Sule Demand for Justice in Santosh Deshmukh Murder Case

Supriya Sule । शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमोर देशमुख कुटुंबीय भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत सरकारवर निशाणा साधला. “देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग करु नये. वेळ पडली तर आम्ही अन्नत्याग आंदोलन करू. त्यांचा लढा आता मी लढणार आहे. बीडमधील गुंडागर्दी संपली पाहिजे. तानाजी सावंतांचा मुलगा सापडतो पण दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही फरार कृष्णा आंधळे (Krishna Andhale) कसा सापडत नाही?”, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

“या प्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून माझ्या भावासाठी न्याय द्या, यासाठी माझा पदर पुढे करणार आहे. बीडमधील सगळी पैशांची आणि सत्तेची मस्ती उतरली पाहिजे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही. ही मस्ती आम्ही सत्याने मोडून काढू,” असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

पुढे त्या म्हणाल्या की, “बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे. येथील महिलांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. वाल्मिक कराड (Walmik Karad) हा व्हिडिओ काढून पोलिसांना सांगत आहे की मी येत आहे. त्याला ज्या वेळी खून झाला त्या वेळी डीवायएसपी यांचे सीडीआर काढा. कृष्णा आंधळेचे सीडीआर मिळाले पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Supriya Sule meet Santosh Deshmukh Family

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सुप्रिया सुळे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या. सुप्रिया सुळे यांनी यावेळी काही मागण्या केल्या, या मागण्या मान्य होणार का? आणि देशमुख कुटुंबीय त्यांचा अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही