Share

कॅप्टन रजत पाटीदार नाही तर ‘हे’ आहेत RCB चे सर्वात महागडे खेळाडू, पहा लिस्ट

by MHD
Not Rajat Patidar but Virat Kohli, Josh Hazlewood, Phil Salt are RCB most expensive players

RCB । 22 मार्चपासून आयपीएलच्या 18 व्या हंगामाला (IPL 2025) सुरुवात होणार आहे. याचे अधिकृत वेळापत्रकही (IPL schedule 2025) जाहीर करण्यात आले आहे. नुकताच आरसीबीने रजत पाटीदार (Rajat Patidar) याला नवीन कर्णधार म्हणून घोषित केले आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघ यंदा तरी विजेतेपद जिंकणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

जरी संघाने रजत पाटीदार याला कर्णधारपद दिले असले तरी तो महागडा खेळाडू नाही. रजत पाटीदारला संघाने 11 कोटी रुपयांच्या किमतीत विकत घेतले आहे. माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगालरुचा सर्वात महाग खेळाडू आहे.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझीने त्याला 21 रुपयांच्या किमतीत संघात राखून ठेवले आहे. आरसीबीचा जोश हेझलवुड हा दुसरा महागडा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड (Josh Hazlewood) याला खरेदी करण्यासाठी आरसीबीने 12 कोटी 50 लाख रुपये खर्च केले आहेत. (RCB most expensive players)

इंग्लंड विकेटकीपर-बॅट्समन फिल सॉल्ट (Phil Salt) याला लिलावातून 11 कोटी 50 लाख रुपये खर्च करून फ्रँचायझीने विकत घेतले आहे, तो आयपीएल 2025 मध्ये दिनेश कार्तिकच्या जागी संघाची जबाबदारी स्वीकारू शकतो.

RCB Full Squad IPL 2025

विराट कोहली, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, जितेश शर्मा, भुवनेश्वर कुमार, रसिक धार, कृणाल पंड्या, टीम डेव्हिड, जेकब बेथेल, सुयश शर्मा, देवदत्त पडीक्कल, नुवान तषारा, रोमारिओ शेफर्ड, लुंगी एनगिडी, स्वप्निल सिंग, लिॲम लिव्हिंगस्टोन, यश दयाल, मोहित राठी, अभिनंदन सिंग, स्वस्तिक चिकारा, मनोज भांडगे.

महत्त्वाच्या बातम्या :

Although RCB has given Rajat Patidar the captaincy, he is not an expensive player. He has been bought by the team for Rs 11 crore.

Marathi News Cricket IPL 2025 Sports

Join WhatsApp

Join Now