Punjab Kings । अवघ्या काही दिवसांवर आयपीएल (IPL) येऊन ठेपली आहे. नुकतेच आयपीएलचे वेळापत्रकही (IPL Schedule 2025) जाहीर करण्यात आले आहे. अशातच आता पंजाब किंग्जला (PBKS) आयपीएलपूर्वीच मोठा झटका बसला आहे. कारण सर्वात महागडा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.
लॉकी फर्ग्युसन हा आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाचा एक भाग आहे. त्याला पंजाब किंग्जने 2 कोटींमध्ये विकत घेतले होते. परंतु, तो दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलमध्ये खेळू शकेल की नाही, हे सांगणे अवघड आहे. जर त्याला आयपीएलमध्ये खेळता आले नाही तर त्याची जागा कोणता खेळाडू घेईल? असा सवाल चाहत्यांना पडला आहे.
Mustafizur Rahman
मुस्तफिझूर रहमान हा आयपीएलच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने खेळताना त्यांची कामगिरी खूप चांगली होती. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 57 सामने खेळले असून त्याने 61 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये लॉकी फर्ग्युसनच्या जागी तो खेळू शकतो.
Kyle Jamieson
काईल जेमिसन न्यूझीलंडचा एक वेगवान गोलंदाज आहे. जर लॉकी फर्ग्युसन आयपीएलमधून आऊट झाला तर त्याच्या जागी संघात काईल जेमिसनचा समावेश होऊ शकतो.
Shardul Thakur
आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक स्टार खेळाडू अनसोल्ड राहिले. यात शार्दुल ठाकूरचा समावेश आहे. आयपीएल 2025 दरम्यान कोणत्याही संघाने शार्दुल ठाकूर सारख्या खेळाडूची खरेदी केली नव्हती. परंतु, तो लॉकी फर्ग्युसनच्या जागी संघात दाखल होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :