Share

पंजाब किंग्ज 11 वर्षानंतर IPL फायनलमध्ये, ट्रॉफीसाठी आरसीबीशी भिडणार

IPL 2025 final: Royal Challengers Bangalore vs Punjab Kings. Both teams never won IPL before. Punjab Kings defeated Mumbai Indians in qualifier 2. Exciting final ahead!

Published On: 

Punjab Kings defeated Mumbai Indians in IPL 2025 Qualifier-2, securing a spot in the final after 2014 with strong performances by Shreyas Iyer and Nehal Wadhera.

IPL 2025 final: आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत एक नवा चॅम्पियन निश्चित होणार आहे. मंगळवार, 3 जून रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत आयपीएलचा खिताब जिंकलेला नाही, त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी खूपच रोमांचक ठरणार आहे.

पंजाब किंग्जने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सला 5 गडी राखून पराभूत केले. मुंबईची सुरुवात खराब होती. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो लवकर बाद झाले. पण तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने 26 चेंडूत 44 धावा केल्या आणि आयपीएलमध्ये 700 धावांचा टप्पा पार केला. नंतर नमन धीरने शेवटच्या टप्प्यात दमदार खेळी करत 37 धावा केल्या.

पंजाबच्या विजयात श्रेयस अय्यरने 41 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 87 रन्स केल्या. तर नहेल वढेरा याने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 रन्स केल्या. जोस इंग्लिसने 21 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह 38 रन्स केल्या. प्रियांश आर्या याने 20 धावांचं योगदान दिलं.

IPL 2025 Final Preview: RCB vs PBKS 

पंजाबने फलंदाजीच्या सुरुवातीला प्रभसिमरन सिंगची विकेट गमावली, पण जोश इंग्लिसने 21 चेंडूत 38 धावा करून संघाला पुन्हा जीवदान दिला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला बाद करून पंजाबला धक्का दिला.

आता अंतिम फेरीत कोण विजेता ठरेल याची उत्कंठा आहे, पण दोन्ही संघांच्या कामगिरीवरून अंतिम सामना खूप जबरदस्त होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही