🕒 1 min read
पुणे – ओबीसी नेते लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) सध्या चर्चेत असून अडचणींचा डोंगर त्यांच्या समोर उभा ठाकलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं होतं की, “अजित पवार हे ‘गोचिडासारखे’ अर्थ खात्याला चिटकून बसले आहेत. त्यांचं राजकारण सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता असं आहे. ते सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील आहेत.
अजित पवारांकडे ना विचार आहे ना तत्त्व. सत्ता कुणाकडे असेल तिकडे तुम्ही जाताय. सत्ता मिळवण्यासाठी पहाटे-पहाटे शपथविधी करणाऱ्यांनी विपश्यना केली पाहिजे. त्यांनी मागासवर्गीय समाजाचा निधी लाडक्या बहिणीसाठी वळवला आहे.”
Laxman Hake Blackmail Allegations by Hanumant Dhyagude
या वक्तव्यानंतर अजित पवार गट आक्रमक झाला होता. सुरज चव्हाण यांनी थेट इशारा देत म्हटलं होतं, “अजित पवार यांच्यावर टीका करण्याची लक्ष्मण हाके यांची लायकी नाही, तसेच लक्ष्मण हाके ढेकूण, देशी दारूचे ब्रँड अॅम्बेसिडर..! यापुढे टीका केली तर महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल.”
तर अमोल मिटकरी यांनी, ” तुम्हाला प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट गमवावं लागतं, तरी स्वतःला ओबीसी नेते म्हणवता? मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके तुझा खारीचा वाटा आहे. तू ओबीसीसाठी काय केलं ते जनतेला सांग? अजितदादांवर बोलण्याआधी स्वतःची औकात पाहा. हाके यांनी स्वतःच्याच गाडीच्या काचा फोडण्यासाठी आपल्या माणसांना सुपारी दिली असल्याचा दावा मिटकरी यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर आता आणखी मोठा आरोप समोर आला आहे. हाके यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे हनुमंत धायगुडे पाटील यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट करून ब्लॅकमेलिंगचा मोठा आरोप केला आहे.
धायगुडे म्हणतात, “हाके हा समाजकारणातील राखी सावंत आहे. तो प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतो. ओबीसी, अठरापगड जाती किंवा गावगाडा समाजाशी त्याला काही देणं-घेणं नाही. तो एक भुरटा लुटारू आहे.” तसेच, त्यांनी असा दावा केला की, हाके ओबीसी समाजाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करतो.
या आरोपांनी लक्ष्मण हाके यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं असून त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या समर्थकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना हाके यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “रात्री तोल जाणाऱ्यांना महत्व नाही”; सुनील तटकरेंचा लक्ष्मण हाकेंना मोठा टोला
- हार्दिक-शुभमन यांच्यात 36 चा आकडा? गिलच्या एका पोस्टने केला मोठा खुलासा, म्हणाला…
- Maharashtra Rain: राज्यात पाऊस घेणार ब्रेक, कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








