Share

सेवानिवृत्त शिक्षिकेला ‘डिजिटल अरेस्ट; IPS नांगरे पाटलांचे नाव सांगत 83 लाखांची फसवणूक

A retired teacher from Ambajogai was duped of ₹83 lakh in a ‘digital arrest’ scam using IPS Vishwas Nangre Patil’s name.

Published On: 

Ambajogai retired teacher falls prey to a fake digital arrest scam; fraudsters used IPS Vishwas Nangre Patil’s name to steal ₹83 lakh via fear and deception.

🕒 1 min read

बीड – जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सेवानिवृत्त शिक्षिकेसोबत थरकाप उडवणारी फसवणूक उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरून स्वतःला पोलिस अधिकारी सांगत, “तुमचं नाव मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडिंग प्रकरणात आलं आहे,” असं सांगून एका भामट्याने शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट केलं आणि तब्बल 83 लाख रुपये लुबाडले आहेत.

Retired Teacher Duped in ₹83 Lakh Digital Arrest Scam

या व्हिडिओ कॉलदरम्यान संजय पिसे नावाच्या आरोपीने मुंबई पोलिसांचं बनावट ऑफिस, झेंडे, लोगो दाखवत शिक्षिकेची भीती वाढवली. त्यात भर म्हणजे, “IPS विश्वास नांगरे पाटलांनी तुमच्यासाठी विशेष विनंती केली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला वाचवतो,” असं सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर भीती दाखवून 21 ते 29 मे दरम्यान तब्बल 83 लाख 1 हजार 816 रुपये उकळले.

IPS Vishwas Nangre Patil Name Misused

या भीतीपोटी पीडित शिक्षिकेने आपलं सोनं व प्लॉट गहाण ठेवून कर्ज घेतलं आणि ते पैसे भामट्यांना ट्रान्सफर केले. ही रक्कम 21 ते 29 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने पाठवण्यात आली. शेवटी 30 मे रोजी व्हॉट्सऍपवरून संपर्क तोडण्यात आला, तेव्हा फसवणुकीची जाणीव होऊन शिक्षिकेने अंबाजोगाई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस विभाग करत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या