बीड, 12 ऑक्टोबर: बीड शहरातील बालेपीर भागात भररस्त्यात एका तरुणाला तीन जणांनी दांडक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाची सोडवणूक करण्यासाठी पुढे आलेल्या महिलांनाही हल्लेखोरांनी दांडक्याचा धाक दाखवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालेपीर परिसरातील मुस्कान फंक्शन हॉलसमोर रात्रीच्या वेळी काही तरुणांमध्ये वाद उफाळून आला होता. या वादातून तीन तरुणांनी मिळून एकाला पकडले आणि त्याला दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून काही महिलांनी मध्यस्थी करत तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या आरोपींनी या महिलांनाही मारहाणीचा इशारा देत धाक दाखवला.
दरम्यान, या हाणामारीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस आल्याचे पाहताच मारहाण करणाऱ्या तरुणांनी तेथून पळ काढला. या संपूर्ण प्रकाराप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Beed Crime) करण्याची प्रक्रिया सुरू होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची दुष्काळ आढावा बैठक; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय चर्चांना उधाण
- संभाजीनगर हादरलं! कन्नडमध्ये राहत्या घरात पत्नीची हत्या, पतीनं स्वतः पोलीस ठाण्यात दिली कबुली
- सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर सरन्यायाधीशांचे ‘एका वाक्यात’ उत्तर; कायदा-सुव्यवस्थेवर काय म्हणाले?
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









