Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीनाम्याच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावं, असे वक्तव्य केले होते. अशातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे (Cabinet Meeting) धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवली. मुंडे यांच्या अनुपस्थितीमुळे धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Dhananjay Munde Absent Cabinet Meeting
मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले आहेत. याच कारणामुळे सरकारवर दबाव वाढत आहे.
इतकंच नाही तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावरही राजीनाम्याच्या मागणीवरून दबाव वाढत आहे, असे बोलले जात आहे. जर याप्रकरणी आणखी दबाव वाढला तर धनंजय मुंडे यांना नाइलाजाने राजीनामा द्यावा लागेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :