Dhananjay Munde । मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून त्यांना चांगलेच घेरले आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित होते. त्यावरून दमानिया यांनी टीका केली आहे. जर ते कॅबिनेटला अनुपस्थित असतील. याचा अर्थ त्यांनी राजीनामा कुठे दिला आहे की काय असा प्रश्न पडतो. गेल्या वेळी असे सांगितले की डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. आज ते बैठकीला का आले नाही याचे कारण काय अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगावे,” असे दमानिया म्हणाल्या.
“सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याबद्दल आता काही बोलायचं नाही, कारण आता त्यांची विश्वासहर्ता संपली आहे. त्यांच्यावर बोलणे मला योग्य वाटत नाही. सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही,” असा दावा दमानिया यांनी केला.
Anjali Damania on Dhananjay Munde
पुढे त्या म्हणाल्या की, “महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या पत्नीने आमरण उपोषण करून काय फायदा? या लोकांना आपण धडे शिकवले पाहिजे. कोणतेच सरकार किंवा राजकारणी त्यांना कोणतीही भावना नाही. आपण कितीही भिंतीवर डोकं जरी आपटलं तरी त्यांच्या पोटाचे पाणी हलणार नाही,” अशी जहरी टीका दमानिया यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :