Share

‘त्या’ भेटीवरून Suresh Dhas आणि बावनकुळेंचे मतभेद, म्हणाले…

Suresh Dhas met Dhananjay Munde. But, now Dhas has told the complete story of the visit.

by MHD

Published On: 

Statement of Suresh Dhas on Chandrasekhar Bawankule on Dhananjay Munde meeting

Suresh Dhas । मागील काही दिवसांपासून भाजपचे आमदार सुरेश धस आणि अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या भेटीवरून राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

“धनंजय मुंडे यांची माणूसकीच्या नात्याने शासकीय विश्रामस्थानी भेट घेतली होती. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मला बोलवल्याने जाणे मला भाग पडले. ही भेट केवळ २० ते ३० मिनिटे झाली होती. पण ती ४ तास का म्हटले गेले हे बावणकुळे यांनाच विचारा,” असे सुरेश धस म्हणाले.

“संध्याकाळी साडेनऊ वाजता गुप्त भेट होऊ शकत नाही. रात्रीच्या दीड वाजेपर्यंत मंत्र्यांच्या चेंबरवर लोक असतात. त्यामुळे माझ्याकडे संशयाने बघण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या लोकांनी या भेटीचं षड्यंत्र केले त्यांचा मी लवकरच पर्दाफाश करणार आहे,” असा इशारा देखील सुरेश धस यांनी दिला.

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवले असून उद्या शिवजयंतीचा दिन म्हणून मी थांबलो आहे. आपण नंतर कृषी साहित्याचे दर सांगणार आहे. कशी फसणवूक झाली याची माहिती देणार आहे. मी सगळे घोटाळे येत्या २० तारखेला बाहेर काढणार आहे,” असे धस म्हणाले.

Suresh Dhas important statement on Dhananjay Munde meeting

दरम्यान, सुरेश धस हे २० तारखेला कोणते घोटाळे बाहेर काढणार? असा सवाल अनेकांना पडला आहे. या घोटाळ्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही