Bigg Boss Marathi 6: घरात ‘भूल भुलैय्या’चा थरार; राखी सावंत बनली ‘मंजुलिका’, नव्या प्रोमोने उडवली खळबळ!

बिग बॉस मराठीच्या घरात ‘भूल भुलैय्या’चा नवा टास्क रंगणार असून, राखी सावंतच्या ‘जुली मंजुलिका’ अवताराने घरात एकच खळबळ उडवून दिली आहे.

Published On: 

Bigg Boss Marathi 6: राखी बनली मंजुलिका, घरात राडा!

बिग बॉसच्या घरात कधी काय होईल सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. स्पर्धकांच्या भांडणांनी आणि राजकारणाने तापलेलं घर आता चक्क एका भयकंपित आणि तितक्याच मजेशीर वळणावर आलंय. समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. कारण, Bigg Boss Marathi 6 च्या घरात आता चक्क ‘भूल भुलैय्या’चा थरार रंगताना दिसणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य वेगवेगळ्या भन्नाट आणि वेडसर अवतारात दिसत आहेत. पण यात सर्वात मोठा राडा घालणार आहे ती म्हणजे ड्रामा क्वीन राखी सावंत! या टास्कमध्ये राखी सावंत ‘जुली मंजुलिका’ बनून घरात धुमाकूळ घालताना दिसतेय. राखीची ती अतरंगी नाट्यमय एन्ट्री आणि तिचा भयानक अवतार पाहून घरातील सदस्यांची चांगलीच भंबेरी उडली आहे.

Bigg Boss Marathi 6

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये जीव तोडून खेळलेला संकेत पाठक आता ‘कवी कुमार’ या हलक्याफुलक्या भूमिकेत दिसतोय. त्याच्या या अनोख्या अवतारातील कविता ऐकून स्पर्धक खळखळून हसणार की कंटाळून डोक्याला हात लावणार, हे पाहणं रंजक ठरेल.

याशिवाय घरात अजून दोन वेडसर पात्रं एन्ट्री घेत आहेत. रुचिता ‘खुली मंजुलिका’ तर प्रभू ‘वेडा लव्हर’ बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. या सगळ्या हटके पात्रांमुळे बिग बॉसचं घर काही काळासाठी जणू एका विनोदी नाटकाच्या मंचासारखं वाटू लागलंय.

नेहमी वादावादीने गाजणाऱ्या या घरात, हा नवा ‘भूल भुलैय्या’ टास्क खेळाला कोणतं नवं वळण देणार? आणि राखीची ही मंजुलिका नेमकं कोणाकोणाचं डोकं फिरवणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही