Samay Raina । इंडियाज गॉट लेटेंटमध्ये (India’s Got Latent) युट्युबर रणवीर अलाहबादियाने (Ranveer Allahabadia) वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाकडून (Maharashtra Cyber Cell) युट्यूबर समय रैनाला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. यामुळे समय रैनाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
समय रैना परदेशात असल्यामुळे त्याने आपली चौकशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे घ्यावी, अशी मागणी केली होती. पण त्याची ही मागणी महाराष्ट्र सायबर विभागाकडून फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा समन्स पाठवले आहेत.
महाराष्ट्र सायबर सेलकडून 19 मार्चपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलने समय रैना, रणवीर अलाहाबादियासह 30 ते 40 जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या उपस्थितीत झालेल्या इंडियाज गॉट लेटेंटच्या 1 ते 6 भागांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा सहभागाची पडताळणी केली जात आहे. तसेच समय रैनाने एक्सवर पोस्ट करत यूट्यूबवरील सर्व चित्रफीती हटवल्याचा देखील दावा केला होता.
Cyber Cell Summons to Samay Raina
याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागासह गुवाहाटी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे समय रैनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला आता चौकशीसाठी हजर राहावेच लागणार आहे, नाहीतर पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :