Share

IPL पूर्वी संघांसाठी आनंदाची बातमी! दुखापतग्रस्त खेळाडूला ‘त्या’ नियमाचा होणार फायदाच फायदा

by MHD
Replacement Rules for IPL 2025

IPL । दरवर्षी आयपीएलच्या नियमांमध्ये (IPL Rule) बदल होत असतात. काही नियमांमुळे संघांना फायदा होतो तर काही नियमांमुळे संघांना झटका बसत असतो. आयपीएलचा असा एक नियम आहे, ज्याचा यंदाच्या सामन्यांमध्ये संघांना खूप फायदा होईल.

जखमी झालेल्या खेळाडूच्या बदलीसाठी बीसीसीआयने महत्त्वाचा नियम (BCCI rule) बनवला आहे. समजा एखादा खेळाडू जखमी झाला तर रजिस्टर्ड अवेलेबल प्लेयर पूल मधून त्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडता (Replacement Rules) येईल.

समजा एखाद्या संघाचे सर्व यष्टीरक्षक जखमी झाले आणि एक किंवा जास्त सामन्यांसाठी उपलब्ध नाहीत. अशा संघाला बीसीसीआयला पूलमधून स्वतःसाठी खेळाडू निवडण्याची विनंती करता येईल. हे लक्षात घ्या की ही परवानगी संघातील मूळ विकेटकीपर फिट होत नाही तोपर्यंत असेल. (IPL Replacement Rules)

एकदा का तो खेळाडू खेळण्यास सक्षम झाला की बदली खेळाडूला संघातून बाहेर जावे लागणार आहे. विशेष म्हणजे हा नियम फक्त भारतीय खेळाडूंसाठी असणार आहे. विदेशी खेळाडूसाठी हा नियम नाही. समजा संघात अगोदरच ८ परदेशी खेळाडू असतील, तर रिप्लेसमेंट खेळाडू भारतीय असावा.

BCCI rules in IPL 2025

दरम्यान, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे IPL 2025 नोंदणी न केलेल्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता यंदाच्या हंगामात कोणता संघ या संधीचा फायदा घेतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

With this decision by the BCCI, it is not ruled out that players who are not registered for IPL 2025 will get a chance.

Sports Cricket IPL 2025 Marathi News