Laxman Hake । मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत येत आहे. बीडमध्ये सातत्याने गंभीर गुन्हे घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“ऊसतोड कामगारांचा, विचारवंतांचा आणि वारकऱ्यांचा जिल्हा अशी बीडची ओळख होती. पण मागील दोन वर्षांपूर्वी येथे जातीवादाची टोकाची दरी निर्माण झाली आणि याला कारणीभूत मनोज जरांगे पाटील आहेत,” असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
“ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्यावरचा मीडियाचा कॅमेरा बाजूला होईल तेव्हापासून पुन्हा येथील जातीय दरी कमी होईल. जर आपल्याला बीडची परिस्थिती पूर्वपदावर आणायची असल्यास येथील लोकप्रतिनिधींची एक सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलावून त्यांना त्यांच्या राजधर्माची आठवण करून दिली तर असे प्रकार कमी होतील,” असा दावा हाके यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर बीड जिल्ह्यातील कोणताही आमदार जाणार नाही. जर तसे झाले तर बीडमधील सुरु असलेली गुंडगिरी आणि दडपशाही संपून जाईल,” अशी आशा हाके यांनी व्यक्त केली.
Laxman Hake on Suresh Dhas
तसेच त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावरही टीका केली. “सुरेश धस खोक्याचा आका आहे. ते आता धस राजीनामा देणार का? धस यांनी पारध्यांच्या टोळ्या पाळल्या आहेत. धस यांच्यापासून भाजपने सावध रहावे,” असा सल्लाही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :